जगभरात कोरोनाचा हैदोस; 1.70 लाखांहून अधिक बळी


नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची जगभरातील संख्या 24,81,026 वर पोहोचली आहे. या जीवघेण्या आजारामुळे आतापर्यंत 1,70,423 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात वल्डोमीटर या संकेतस्थळाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेमध्ये 7,92,759, स्पेनमध्ये 2,00,210, इटलीमध्ये 1,81,228, फ्रान्समध्ये 1,55,383 कोरोना बाधित आहेत. तर आतापर्यंत अमेरिकेमध्ये 42,514, स्पेनमध्ये 20,852, इटलीमध्ये 24,114, फ्रान्समध्ये 20,265 आणि चीनमध्ये 4,632 लोकांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिका, इटली आणि स्पेननंतर फ्रान्स चौथा असा देश बनला आहे. जिथे 20 हजारांहून अधिक लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. याबाबत फ्रान्सचे आरोग्य अधिकारी जेरोम सालोमोन यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्समध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 20,265 लोकांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये मागील 24 तासांमध्ये 547 लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये 444 लोक हॉस्पिटल्स आणि 103 लोकांचा नर्सिंग होम्समध्ये मृत्यू झाला आहे. अशातच मागील 24 तासांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात वेगाने वाढ झाली आहे. दरम्यान, सालोमोन यांनी सांगितले की, आता कोरोनाच्या प्रादूर्भावामध्ये कमतरता दिसून येत आहे. कारण 5683 रूग्णांना आवश्यक त्या सर्व सेवा पुरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच सोमवारी हा आकडा 8 एप्रिलच्या तुलनेत खाली आला.

या महामारीमुळे अमेरिकेमध्ये सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे अमेरिकेमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या 42,000 पार पोहोचली आहे. अमेरिकेमध्ये 42,514 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 7,92,759 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कमीत कमी 72,389 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

गेल्या 24 तासात अमेरिकेतील 1939 लोकांनी आपले प्राण गमावले असून बळींचा आकडा एकूण 42 हजार 514वर पोहोचला आहे. तर रुग्णांची संख्या सात लाख 93 हजारांवर पोहोचली आहे. काल न्यूयॉर्क प्रांतात 631 बळी गेले असून तिथे रुग्णांची संख्या 2 लाख 52 हजारांवर तर एकूण मृतांचा आकडा 18,929 वर पोहोचला आहे. त्या खालोखाल न्यूजर्सीत 4377, मिशिगनमध्ये 2468, मासाचुसेट्स 1809, लुझियाना 1328, इलिनॉईस 1349, कॅलिफोर्निया 1223, पेनसिल्वानिया 1348, कनेक्टिकट 1331 आणि वॉशिंग्टनमध्ये 652 लोकांचा बळी या रोगाने घेतला आहे.

जगभरातील बहुतांश देशांवर कोरोनाचा प्रभाव झाला आहे. काल जर्मनीत 220 बळी गेले, एकूण बळींची संख्या 4862 झाली आहे. इराणमध्ये काल बळींच्या संख्येत काल 91 ची भर पडली असून एकूण 5209 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या 83505 वर पोहोचली आहे. कोरोनाने बेल्जियममध्ये काल 145 जण मृत्यूमुखी पडले असून एकूण बळींचा आकडा 5548 वर पोहोचला आहे. हॉलंडमध्ये काल 67 बळी घेतले तिथे एकूण 3751 लोक दगावले आहेत. टर्की 2140, ब्राझील 2587, स्वित्झर्लंडने 1429, स्वीडनमध्ये 1580, पोर्तुगाल 735, कॅनडात 1690, इंडोनेशिया 590, तर इस्रायलमध्ये 177 बळी गेले आहेत. दक्षिण कोरियात काल 2 मृतांची भर पडली, एकूण मृतांचा आकडा 236 वर पोहोचला आहे. आपला शेजारी असलेल्या पाकिस्तानात रुग्णांची संख्या 8892 वर पोहोचली आहे, तर तिथे 176 लोकांचा बळी कोरोनाने घेतला आहे. गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 73928 तर बळींच्या आकड्यात 5366 ची भर पडली आहे.

Leave a Comment