देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 18 हजार पार, 590 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली : दिवसेंदिवस देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून यासंदर्भात आरोग्य मंत्रालयानी दिलेल्या आकडेवारीनुसार 18 हजारांवर देशातील कोरोनाबाधितांची संख्या गेली आहे. देशातील 18 हजार 601 जणांना सध्या कोरोनाची लागण झाली असून 590 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 3252 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आरोग्य मंत्रालयाने सागितले की, देशातील लॉकडाऊनमुळे कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात वाढ होण्याचा वेग मंदावला आहे. लॉकडाऊनआधी हा वेग 3.4 दिवस एवढा होता आता हा वेग 7.5 दिवसांवर पोहोचला आहे.

आरोग्य मंत्रालयानी दिलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र मध्ये 232, मध्य प्रदेश 74, गुजरात71, दिल्ली 47, तमिळनाडू 17, तेलंगणा23, आंध्रप्रदेश 20, कर्नाटक 16, उत्तर प्रदेश 18, पंजाब 16, पश्चिम बंगाल 12, राजस्थान 25, जम्मू-कश्मीर 5, हरियाणा 3, केरळ 3, झारखंड 2, बिहार 2, आसाम, हिमाचल प्रदेश आणि ओडिसा मध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाचे सर्वाधिक 4666 रुग्ण महाराष्ट्रात आहेत. यामध्ये सर्वाधिक मुंबईत 3032 लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यानंतर पुण्यात 594 लोक कोरोना बाधित आहेत. महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीमध्ये 2 हजार रुग्ण आणि गुजरात तिसऱ्या क्रमांकावर असून त्याठिकाणी 1 हजार 851 रुग्ण आढळले आहेत. तर आंध्र प्रदेशमध्ये 722, अंदमान निकोबार 15, अरुणाचल प्रदेश 1, आसाम 35, बिहार 96, चंदीगढ 26, छत्तीसगढ 36, हरियाणा 233, हिमाचल प्रदेश 39, जम्मू-कश्मीर 350, झारखंड 42, कर्नाटक 395, केरळ 402, लद्दाख 18, मध्य प्रदेश 1485, मणिपुर 2, मेघालय 11, मिझोरम एक, ओडिसा में 68, पाँडेचेरी 7, पंजाब 219, राजस्थान 1478, तमिळनाडू 1477, तेलंगणा 873, त्रिपुरा 2, उत्तराखंड 44, उत्तर प्रदेश 1176 और पश्चिम बंगालमध्ये 339 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

Leave a Comment