कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यातील आणखी 22 परिसर सील


पुणे : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून मुंबईनंतर पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा अधिक आहे. पुण्यातील आणखी २२ ठिकाणे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सील केले जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पत्र पाठविले आहे. पुण्यात सध्या मार्केटयार्ड ते आरटीओपर्यंतचा भाग सील आहे. आता आणखी २२ भाग सील होणार आहेत.

नव्याने सील करण्यात येणारे बहुतांशी परिसर हे दाट लोकवस्ती व झोपडपट्टी परिसर आहे़त. याबाबतचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयास सोमवारी सादर केला आहे़. हे परिसर पूर्णपणे सील करण्यापूर्वी आवश्यक पोलिसबळ उपलब्ध आहे का याची चाचपणी सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेण्यात येत असून, पोलीस यंत्रणेकडून याबाबत अहवाल प्राप्त झाल्यावर हा निर्णय अपेक्षित आहे.

महापालिकेच्या सुचनेनुसार हे परिसर होणार सील

  • प्रायव्हेट रोड पत्राचाळ, लेन क्र. १ ते ४८, ताडीवाला रोड प्रभाग क्र. २०
  • संपूर्ण ताडीवाला रोड
  • घोरपडी गाव, विकासनगर, बालाजीनगर, श्रावस्तीनगर प्रभाग क्र. २
  • राजेवाडी, पद्मजी पोलीस चौकी, जुना मोटार स्टॅँड, सेत कबीर, एडी कॅम्प चौक, क्वार्टर गेट, भवानी पेठ प्रभाग क्र. २०
  • विकासनगर, वानवडी गाव
  • लुम्बिनी नगर, ताडीवाला रोड
  • चिंतामणी नरगर, हांडेवाडी रोड, प्रभाग क्र. २६ व २८
  • घोरपडी गाव, बी. टी. कवडे रोड
  • संपूर्ण लक्ष्मीनगर, रामनगर, जयजवान नगर, येरवडा प्रभाग क्र. ८
  • सय्यदनगर, मह्ममदवाडी हडपसर प्रभाग क्र. २३, २४व २६
  • पर्वती दर्शन परिसर
  • सम्राट हॉटेल ते पाटकर प्लॉट, पुणे- मुंबर्स रस्ता ते भोसलेवाडी, कामगार आयुक्त कार्यालय, रेल्वे डावी बाजू व उजव्या बाजुस नरवीर तानाजी चौक ते जुने शिवाजीनगर एसटी स्टॅँड, पटेल टाईल्स, विक्रम टाईल्स, इराणी वस्ती सर्व्हे
  • संपूर्ण पाटील इस्टेट परिसर
  • संपूर्ण भोसलेवाडी परिसर
  • वाकडेवाडी परिसर प्रभाक क्र. ७
  • एनआयबीएम रोड, कोंढवा प्रभाग क्र. २६
  • संपूर्ण कोंढवा खुर्द परिसर, साईनगर
  • वडगाव शेरी परिसर प्रभाग क्र. ५
  • धानोरी प्रभाग क्र. १
  • येरवडा प्रभाग क्र. ६
  • विमानगर प्रभाग क्रमांक ३

सोमवारी राज्यात वाढ झालेल्या 352 रुग्णांपैकी 242 रुग्ण हे मुंबईतील आहेत. तर पुण्यातही गेल्या 24 तासांत 39 रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोना रूग्णांची संख्या रविवारपर्यंत 1982 एवढी होती, ती आज 352 ने वाढून 2334 पर्यंत पोहोचली आहे.

Leave a Comment