कोरोना : या वनविभागाने नागरिकांना केले चक्क झाडांना मिठी मारण्याचे आवाहन

जगभरातील देशांमध्ये कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग आणि लॉकडाऊन पाळले जात आहे. मात्र आयसलँडने या परिस्थितीमध्ये वेगळा मार्ग निवडला आहे.

आयसलँडच्या वनविभागाने नागरिकांना चक्क सोशल डिस्टेंसिंग पाळत झाडांना अलिंगन देण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाहीतर पुर्व आइसलँडच्या हॅलोर्सटॅओर राष्ट्रीय वनाच्या येथे वनविभागाचे कर्मचारी रस्त्यावरील बर्फ हटवत आहेत, जेणेकरून स्थानिक लोक झाडांना मिठी मारण्यास जाऊ शकतील.

फॉरेस्ट रेंजर्सनी लोकांना सांगितले आहे की, जे पहिले झाड दिसेल त्याला मिठी मारण्याऐवजी वेगवेगळ्या झाडांना मिठी मारावी. झाडांना 5 मिनिटे मिठी मारून दिवसाची आनंदाची सुरूवात करणे चांगले असल्याचे फॉरेस्ट रेंजर्सचे म्हणणे आहे. एका अधिकाऱ्यानुसार, झाडाला मिठी मारल्याने पायापासून ते छाती आणि मेंदूमध्ये एक भावना निर्माण होते.

तज्ञांच्या मते, व्हायरस हा लाकाडावर देखील दिर्घकाळ राहू शकतो. दरम्यान, आयसलँडमध्ये आतापर्यंत 1700 पेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून, 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment