आणि पॅरिसमध्ये दिसले झेब्रा आणि घोडे

लॉकडाऊनच्या काळात प्राणी अचानक शहरातील रस्त्यावर फिरत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच काहीशी हैराण करणारी घटना पॅरिसमध्ये पाहण्यास मिळाली. पॅरिसमध्ये चक्क झेब्रा आणि दोन घोड्यांना रस्त्यावर धावताना पाहून नागरिक देखील हैराण झाले.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून, व्हिडीओमध्ये दिसत आहे की, प्राणी रस्त्यांवर गाड्यांसोबत धावत आहे. या प्राण्यांनी सर्कसमधून पळ काढला होता.

या प्राण्यांनी ऑर्मेसन सुर-मार्ने या गावातील सर्कसमधून पळाले व त्यांनी थेट शेजारील शहर चॅम्पिंगे सुर-मार्ने गाठले. बॅडिन सर्कसच्या मालकाने सांगितले की, हे प्राणी नियंत्रणात असून, त्यांनी लांब पळ काढलेला नाही.

प्राणी रस्त्यावर धावतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आतापर्यंत या व्हिडीओला 2 लाखांपेक्षा अधिक जणांनी बघितले आहे.

सर्कसचे मालक मॉउलोट यांनी सांगितले की, दिवस पार्कमध्ये असतात व रात्री त्यांना ट्रेलरमध्ये ठेवले जाते. कुंपणाचे गेट उघडले राहिल्याने त्यांनी पळ काढला. ते केवळ 15 मिनिटे बाहेर होते, त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

Leave a Comment