इस्रायलने केला 90 दिवसांत कोरोनावरील लस तयार करण्याचा दावा


जेरुसलेम : चीनमधून चार महिन्यांपूर्वी कोरोना व्हायरसने जगात प्रवेश केला. या धोकादायक व्हायरसमुळे आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. तर जगभरातील 18 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. पण या व्हायरसवर अद्याप कोणत्याही देशाला लस शोधता आलेली नाही. सुमारे 50 देशांमध्ये लस तयार करण्यासाठी संशोधन चालू आहे. दरम्यान, कोरोनाची प्रतिबंधित लस इस्रायलने तयार केली असून त्यांचे वैज्ञानिक येत्या 90 दिवसांत कोरोनाशी लढा देण्यासाठी लस पूर्णपणे तयार करतील असा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

यासंदर्भात इस्त्रायलमधील टेलिग्राम चॅनेलने दिलेल्या वृत्तानुसार, ही लस 90 दिवसात तयार होणार आहे. येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार ओफिर अकुनिस यांनी दावा केला आहे की, कोरोना दूर करण्यासाठी 90 दिवसांच्या आत लस तयार करेल. त्यांच्या मते ही एक अतिशय अनोखी आणि प्रभावी लस आहे. मिगेल गॅलेली रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इस्त्रायलच्या शास्त्रज्ञांचेही मंत्री यांनी अभिनंदन केले. ही लस लवकरच वापरत आणली जाईल आणि नंतर ती इतर देशांना दिली जाईल.

इस्त्रायलमध्ये कोरोना विषाणूसारखा आणखी एक आजार कोंबड्यांमध्ये पसरला आहे. याचा सामना करण्यासाठी येथील संशोधन संस्थेने एक लस तयार केली आहे. गेल्या चार वर्षांत बनविलेली ही एक अतिशय प्रभावी लस आहे. याचा लसीचा वापर करून त्यांनी कोरोना प्रतिबंधित लस तयार केली. या संशोधन गटाचे प्रमुख डॉ. कार्ट्झ म्हणाले की, आम्ही खूप आधीपासून हा अभ्यास सुरू केला आहे. आमच्या सिस्टमसाठी आम्ही कोरोनो व्हायरसची मॉडेल म्हणून निवडण्याचे ठरविले आणि हे अशाप्रकारे वापरले जाऊ शकते हे समजले नाही.

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीकरणशास्त्र विभागाच्या प्रोफेसर सारा गिलबर्ट यांनी दावा केला आहे की, तिची टीम कोरोना विषाणूची लस लवकरच तयार करेल. येत्या 15 दिवसांत कोरोना विषाणूची लस चाचणी करणार असल्याचे सारा यांनी सांगितले. सारा यांना या लसीबाबत 80 टक्के विश्वास आहे. या चाचणीचा निकाल चांगला आल्यास सरकार यासाठी निश्चितपणे निधी जाहीर करेल, याचीही चिन्हे असल्याचा विश्वास सारा यांनी व्यक्त केला. याआधी अमेरिकेने मानवावर लसीची चाचणी केली होती. पण अद्याप या लसीबाबत अधिक माहिती मिळाली नसल्यामुळे अमेरिकेआधी ब्रिटनमध्ये ही लस तयार केली जाऊ शकते.

Leave a Comment