व्हिसाचे उल्लंघन करणाऱ्या १५६ परदेशी नागरिकांविरोधात गुन्हे दाखल


मुंबई – सध्या देशभरासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू असून पोलीसांनी व्हिसाचे या काळात उल्लंघन केल्याप्रकरणी १५६ परदेशी नागरिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परदेशी व्यक्ती कायदा कलम १४ ब आणि भादंवि कलम १८८, २६९, २७० नुसार या १५६ परदेशी नागरिकांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. याबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अमरावती, नांदेड, नागपुर, पुणे, अहमदनगर, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये हे एकूण १५ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पर्यटन व्हिसा घेऊन हे सर्व परदेशी नागरिक भारतात आले आहेत. व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन करून ते निजामुद्दीन, दिल्लीच्या मरकजमध्ये सामिल झाले होते. या परदेशी नागरिकांमध्ये कझाकिस्तान – ९, दक्षिण अफ्रिका -१, बांगलादेश – १३, ब्रूने – ४, आयवोरियन्स – ९, इराण-१, टोगो – ६, म्यानमार – १८, मलेशिया – ८, इंडोनेशिया – ३७, बेनिन – १, फिलिपाईन्स – १०, अमेरिका – १, टांझानिया – ११, रशिया – २, जिबोती – ५, घाना – १, किर्गिस्तान – १९ या देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. या सर्वांना क्वारंटाइनमध्ये करण्यात आले आहे.

Leave a Comment