
मुंबई : रविवारी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना डिस्चार्ज मिळाला असून याबाबतची माहिती डाउनिंग स्ट्रीटचे प्रवक्तांनी दिली. बोरिस कोरोना व्हायरसमुळे एका आठवड्यापासून रूग्णालयात दाखल होते. त्याचबरोबर त्यांना प्रकृती अस्वस्थामुळे आयसीयूत दाखल करण्यात आले होते. त्यांनी या अगोदर डाउनिंग स्ट्रीटमध्ये स्वतःला सेल्फ आयसोलेशन देखील केले होते आणि ते तेथूनच काम करत होते.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रूग्णालयातून डिस्चार्ज
त्यांना तीन दिवस आयसीयूत ठेवल्यानंतर गुरूवारी जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते घरातून आपले काम करणार आहेत. डाउनिंग स्ट्रीटच्या प्रवक्तांनी सांगितले की, बोरिस मेडिकल टिमच्या सल्ल्यानुसार लगेच कामाला सुरूवात करणार नाही. त्यांनी आयसीयूतून बाहेर आल्यावर सगळ्यांचे आभार मानले. फक्त आभार मानने पुरेसे नाही मी त्यांचा ऋणी आहे. अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पंतप्रधानांची गर्लफ्रेंड कॅरी साइमंड्स गरोदर असून त्यांनी तिला पत्र पाठवले की, आपल्या बाळाचे स्कॅनिंग करून घे. जेणेकरून मी रूग्णालयात शांतपणे राहू शकतो. बोरिस यांच्या चाहत्यांना ‘गेट वेल सून’ कार्ड देखील पाठवले. कोरोना व्हायरसमुळे ९,८७५ लोकांचा मृत्यू झाला असून ७८,९९१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
२७ मार्ज रोजी बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. या संदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली होती. कोरोनाची लक्षणे आढलल्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. आणि ती टेस्ट पॉझिटीव्ह आली होती.
