आता अ‍ॅमेझॉनने अ‍ॅलेक्सावर युजर्सला मिळणार कोरोनाची माहिती

कोरोना व्हायरस महामारीने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसपासून वाचण्यासाठी व लोकांपर्यंत योग्य माहिती पोहचवण्यासाठी टेक्नोलॉजीची मदत घेतली जात आहे. आता ई-कॉमर्स साईट अ‍ॅमेझॉनने आपले वॉइस असिस्टेंट अ‍ॅलेक्सासाठी अपडेट जारी केले आहे. या अ‍पडेटमुळे आता युजर्स अ‍ॅलेक्साच्या माध्यमातून कोव्हिड-19 संदर्भातील माहिती जाणून घेऊ शकतील.

अ‍ॅलेक्साच्या माध्यमातून युजर्स कोरोना व्हायरसची लक्षण जाणून घेऊ शकतील. हे वॉइस असिस्टेंट इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत सपोर्ट करते.

अ‍ॅमेझॉनचे म्हणणे आहे की, कंपनीने आयसीएमआरची गाईडलाईन लक्षात घेऊन अ‍ॅलेक्साच्या अपडेटला कोरोना व्हायरसच्या लक्षणांसोबत तयार केले आहे. अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सा आपल्या युजर्सला हात धुण्याचा देखील सल्ला देते.

नवीन अपडेट अंतर्गत अ‍ॅलेक्सा युजर्स कोरोनाग्रस्तांची संख्या आणि लॉकडाऊन संदर्भातील महत्त्वपुर्ण माहिती देईल. लॉकडाऊनमध्ये काय-काय करावे, याची माहिती देईल अ‍ॅलेक्साद्वारे मिळेल.

दरम्यान सरकारने देखील फेसबुकसोबत मिळून कोरोना हेल्पडेस्क चॅटबॉट लाँच केला आहे. या चॅटबॉटवर युजर्सला कोरोना व्हायरस संदर्भातील माहिती मिळेल.

Leave a Comment