लॉकडाऊननंतर विमानप्रवास तीनपटींनी महागण्याची शक्यता

लॉकडाऊनमुळे विमानसेवा बंद आहेत. यामुळे एव्हिएशन सेक्टरला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. लॉकडाऊननंतर हे नुकसान भरून काढण्यासाठी एअरलाईन्सकडून प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे लॉकडाऊननंतर विमानप्रवास तीनपटींनी महागण्याची शक्यता आहे. तसेच सोशल डिस्टेंसिंग पाळण्यासाठी प्रवाशांच्या संख्येत देखील कपात केली जाईल.

उड्डाण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनुसार, लॉकडाऊननंतर विमानप्रवासात तीन सीटच्या रांगेत एकाच प्रवाशाला बसवण्यासंदर्भात विचार सुरू आहे. यानंतर त्याच्या मागील रांगेत विरुद्ध सीटवर दुसऱ्या प्रवाशाला बसवले जाईल. म्हणजेच एका रांगेतील प्रवासी पहिल्या सीटवर बसेल तर त्याच्या मागील प्रवासी विंडो सीटवर बसेल.

याशिवाय विमानातील 180 प्रवाशांची क्षमता दोन तृतियांश करण्याचा विचार आहे. म्हणजे केवळ 60 प्रवाशी प्रवास करू शकतील. हे नुकसान भरून काढण्यासाठी एअरलाईन्स 1.5 ते 3 पट भाडे वाढवू शकते.

अधिकाऱ्यानुसार, जसजसे कोरोनाचे संक्रमण कमी होत जाईल, तसतसे सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांमध्ये सुट दिली जाईल.

नागरी उड्डाण महासंचालनालय लॉकडाऊननंतर विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात योजना बनवत आहे. यामध्ये विमानतळावर चेक इन काउंटर, सेक्युरिटी चेक, इमिग्रेशन काउंटर्स आणि बोअर्डिंग गेट्स येथे प्रवाशांसाठी 1.5 मीटर अंतराचे पॉइंट्स तयार केले जातील.

Leave a Comment