बृह्ममुंबई महानगरपालिकेत ११४ वॉर्ड बॉयची भरती


मुंबई – सध्या राज्यातील आरोग्य यंत्रणेवर कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कामाचा तणाव असून रात्रंदिवस मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या रुग्णालयातही डॉक्टर, नर्स आणि वॉर्डबॉय यांना काम करावे लागत आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने याचसाठी ११४ परिचर कक्ष म्हणजेच वॉर्ड बॉयची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या जागांसाठीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून पोस्ट किंवा ईमेल आयडीवर १७ एप्रिल २०२० पूर्वी अर्ज पाठवण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

दहावी पास या पदासाठी शैक्षणिक पात्रता असून १८ ते ५७ हजार एवढा पगारही मिळणार आहे. महापालिकेच्या http://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावरुन इच्छुक उमेदवारांनी अर्जाचा नमुना डाऊनलोड करायचा आहे. सर्व नियम आणि अटी वाचल्यानंतर अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF Format मध्ये अर्जासह [email protected] या ईमेल आयडीवर पाठवायच्या आहेत. ईमेल करणे ज्या उमेदवारांना शक्य नसल्यास पोस्टाने किंवा महापालिकेच्या मुख्यालयातील गेट क्रमांक ७ या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या बॉक्समध्ये १७ एप्रिल संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पाठवण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

Leave a Comment