राज्य सरकारची घरकामगार आणि वाहन चालकांसाठी पंतप्रधान श्रम मानधन योजना


मुंबई : राज्याच्या कामगार विभागाने कोरोनामुळे ओढावलेल्या संकटाच्या काळात घर कामगार, खाजगी वाहन चालकांना आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. घर कामगार आणि खाजगी वाहन चालकांची माहिती या अनुषंगाने राज्य सरकारच्या कामगार विभागाने मागवली आहे.

राज्य कामगार विभागाचा घर कामगार आणि वाहन चालकांना पंतप्रधान श्रम मानधन योजनेचा लाभ देण्याचा विचार आहे. ही माहिती यासाठी मागवण्यात आली आहे. ही माहिती मेलद्वारे राज्यातील गृहनिर्माण सोसायटींना जिल्हा उपनिबंधकांकडे पाठवण्यात येणार आहे. जिल्हा उपनिबंधकांना संबंधित सोसायटीत काम करणार्‍या घर कामगार आणि वाहन चालकांचे नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, रेशनिंग कार्ड नंबर, जन्म तारीख अशी माहिती सोसायटीच्या माहितीसह मेल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घर कामगार आणि वाहन चालकांचा रोजगार कोरानाच्या पार्श्वभूमीवर बुडाल्याने त्यांना पंतप्रधान श्रम मानधन योजना सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या कामगार विभागाने घेतला आहे.

Leave a Comment