अरेच्चा ! लॉकडाऊनमध्ये येथे रस्त्यावर सापडत आहेत 500-2000 च्या नोटा

दिल्लीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. येथील हॉटस्पॉटची संख्या 25 झाली आहे. मात्र या लॉकडाऊनच्या काळात दिल्लीत एक विचित्र गोष्ट पाहण्यास मिळाली.

दिल्लीचे अनेक भाग सील करण्यात आलेले आहेत. अशा स्थितीत द्वारका सेक्टर 4 मध्ये पोलिसांना रस्त्यावर 500 आणि दोन हजार रुपयांच्या नोटा सापडत आहेत.

आधी पोलिसांनी पोलीस स्टेशनजवळ 500 रुपयांच्या तीन नोटा सापडल्या. यानंतर पुन्हा एकदा असाच एक प्रकार समोर आला. पोलिसांना 9 मार्चला बुद्ध विहारमध्ये 2 हजार रुपयांच्या अनेक नोटा रस्त्यावर सापडल्या. मात्र यावेळी एका व्यक्तीने या पैशांबाबत दावा केला असून, चुकीने हे पैसे पडल्याचे सांगितले.

द्वारकाचे डीसीपी म्हणाले की, आतापर्यंत एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही. त्यात कोणतेही षडयंत्र आहे असे वाटत नाही.

Leave a Comment