मरकजवरून परतल्याची माहिती लपवल्याने माजी काँग्रेस नगरसेवकाविरोधात तक्रार दाखल

दिल्लीच्या द्वारका भागातील लॉकडाऊन दरम्यान क्वारंटाईनचे पालन न केल्याने मरकजवरून परतलेल्या एका माजी नगरसेवकावर दिल्ली पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. नफजगढच्या दीनपूर गावाचे काँग्रेसचे माजी नगरसेवकाला आरोग्य अधिकाऱ्यांनी घरात होम क्वारंटाईनचे आदेश दिले होते. चाचणी अधिकाऱ्यांना तपासणी दरम्यान ते त्यांच्या घरी आढळले नाहीत.

यानंतर तपासणी केली असताना त्यांनी आपला मागील प्रवास आणि तबगिली जमातमध्ये सहभागी झाल्याची माहिती दिली नसल्याचे समोर आले आहे. त्यांच्या कॉल डिटेल्स आणि चौकशीनंतर पोलिसांना समजले की, ते मार्चमध्ये मरकज निझामुद्दीन येथे गेले होते, जेथे ते तबलिगी जमातमध्ये सहभागी झाले होते.

आता चाचणी केल्यानंतर माजी नगरसेवक, त्यांची पत्नी (ज्या सध्या नगरसेवक आहेत) आणि मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यांच्या बेजबाबदारपणामुळे दीनपूर भागाला नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. मागी महिन्यात तबलिगी जमातमध्ये सहभागी झाल्याची माहिती मागितली असताना, त्यांनी ही गोष्ट लपवली होती.

अधिकाऱ्यांनी जवळपास 250 घर असलेल्या दीनपूर गावाला आता सील केले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व गावकऱ्यांना घरातच राहण्याची सूचना देण्यात आली आहे. याशिवाय अत्यावश्यक वस्तूंसाठी सरकारी एजेंसीना संपर्क करण्याची विनंती करण्यात आली आहे.

Leave a Comment