उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, कोरोनाग्रस्तांवर उपचारांसाठी तीन प्रकारची वेगवेगळी रुग्णालये


मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना बाधितांवर चांगले आणि प्रभावी उपचार करता यावेत यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची घोषणा केली आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचारांसाठी चार भागांमध्ये आरोग्य सेवेची विभागणी करण्यात आली आहे.

ज्यांना सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे असतील त्यांनी खासगी दवाखान्यात न जाता क्युअर क्लिनिकमध्ये जावे. प्रत्येक विभागात ही क्लिनिक असतील. त्याची माहिती देण्यात येईल असे उद्धव ठाकरे म्हणाले. कोरोनाची सौम्य लक्षणे ज्यांच्यामध्ये असतील त्यांच्यासाठी एक वेगळे हॉस्पिटल असेल. थोडया जास्त प्रमाणात कोरोनाची लक्षणे असलेल्यांसाठी दुसरे हॉस्पिटल असेल आणि ज्यांच्यामध्ये कोरोनाची अतीतीव्र लक्षणे आहेत, तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह किडनी असे अन्य आजारही आहेत, त्यांच्यासाठी तिसरे रुग्णालय असेल. हे रुग्णालय अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असेल असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम केले आहे. लष्करात वैद्यकीय सेवा बजावलेल्या व्यक्तींना कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी मदत करायची असेल तर त्यांनी [email protected] वर संपर्क करावा. तुमची महाराष्ट्राला गरज असल्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Leave a Comment