कोरोना : मुंबईत विनामास्क फिरल्यास होणार अटक

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांना मास्क घालण्यास सांगितले जात आहे. आता मुंबई महानगरपालिकेने मुंबईत नागरिकांना मास्क घालणे अनिवार्य केले आहे, मास्क न घातल्यास अशा लोकांना अटक करण्यात येईल. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने, महानगरपालिकेने हे पाऊल उचलण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर आयपीसी कलम 188 अंतर्गत कारवाई केली जाईल.

मुंबईत आतापर्यंत 782 कोरोनाग्रस्त आढळले असून, त्यातील 50 जणांचा मृत्यू झाला आहे.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, चाचणीची संख्या देखील वाढवण्यात येणार असून मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली असल्याने शहरातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Comment