भारताने अमेरिकेला झापले, हवी ती राजकीय मदत करतो, पण राजकारण नका करु


नवी दिल्ली – हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन औषधावरुन जशास तसे उत्तर देण्याची भाषा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वापरल्यानंतर भारतानेही अमेरिकेला आपल्या भाषेत उत्तर दिले आहे. आपल्या शेजारी देशांना व कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक त्रस्त असलेल्या देशांना भारत जीवनावश्यक औषधांचा पुरवठा करेल. त्यामुळे यावरुन कुठलेही अंदाज बाधू नका तसेच राजकारणही करु नका, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.

आमच्यावर अवलंबून असलेल्या शेजारी राष्ट्रांना आम्ही हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन आणि पॅरासीटेमॉल औषधांचा पुरवठा करणार असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले. कोरोनाची भीषणता लक्षात घेता आंतरराष्ट्रीय समुदायाने मानवतेच्या दृष्टीकोनातून एकजूटता आणि सहकार्य केले पाहिजे ही भारताची सुरुवातीपासून भूमिका आहे. आमच्यासोबत अनावश्यक वाद निर्माण करु नका. देशांतर्गत गरज पूर्ण झाल्यानंतर अन्य देशांना जीवनावश्यक औषधांचा पुरवठा करण्यात येईल, असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. भारताने औषधाच्या निर्यातीवर बंदी का घातली ? यावर श्रीवास्तव म्हणाले की, सर्वप्रथम आपल्या देशातील जनतेसाठी औषधांचा पुरेसा साठा करुन ठेवणे हे कुठल्याही जबाबदार सरकारचे पहिले कर्तव्य आहे.

Leave a Comment