पुण्यातील आणखी तीन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू


पुणे – पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात दिवसेंदिवस लक्षणीय वाढ तर होतच आहे, पण धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याचबरोबर या व्हायरसमुळे मृत पावणाऱ्यांच्या आकड्यातही वाढ होत आहे. दरम्यान मंगळवारी ससून रुग्णालयात उपचारांदरम्यान तीन नव्या रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. विविध आजार या तीनही रुग्णांना होते. यामुळे पुण्यात आत्तापर्यंत ८ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, आज (मंगळवारी) सकाळी ९ ते ११ या वेळेत ससून रुग्णालयात तीन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. या तिन्ही मृतांचे वय ६० वर्षांपुढील आहे. यांपैकी दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता.

Leave a Comment