कोरोना : जगभरात लॉकडाऊन मोडल्यास या आहेत शिक्षा

कोरोना व्हायरस महामारीमुळे जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र असे असताना देखील नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. यामुळे आता प्रत्येक देशाच्या सरकारने अशा लोकांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.

अनेक देशांनी लॉकडाऊन मोडणाऱ्यांना दंड आणि जेलची शिक्षा देण्याचे नियम केले आहेत. जगभरातील जवळपास 90 देश लॉकडाऊन असून, येथे 450 कोटी लोक आपल्या घरात कैद आहेत.

इटली – विनाकारण घराच्या बाहेर पडल्या या देशात अडीच लाख दंड आणि लोमार्डी येथे 4 लाख रुपये दंडाची तरतूद आहे. आतापर्यंत 40 हजारांपेक्षा अधिक जणांना दंड ठोठवण्यात आला आहे.

रशिया – येथे क्वारंटाईन मोडल्यास 7 वर्षांचा कारावास आणि मॅक्सिकोमध्ये आजार लपवल्यास 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे.

फिलिपाईन्स – या देशाचे राष्ट्रपती दुतेर्ते यांनी क्वारंटाईन नियम मोडणाऱ्यांना थेट गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.

ऑस्ट्रिया-चेक प्रजासत्ताक – येथे बाहेर पडण्यासाठी मास्क घालणे गरजेचे आहे.

सौदी अरेबिया – लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरताना आढळल्यास 1 कोटी रुपये दंडाची तरतूद आहे. आरोग्य आणि प्रवाशाची माहिती लपवल्यास जवळपास 93 लाख रुपये दंडाची शिक्षा आहे.

पनामा –  या देशात बाहेर पडण्यासाठी पुरूष व महिलांसाठी वेगवेगळे देश निश्चित करण्यात आलेले आहेत. महिला सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 2 तासांसाठी बाहेर निघू शकतात.

कोलंबिया – या देशात आयडी नंबरच्या आधारावर बाहेर जाण्याची परवानगी आहे. ज्यांचा आयडी क्रमांक 0, 4, 7 आहे ते केवळ सोमवारी बाहेर निघू शकतात.

Leave a Comment