भारतीय वैज्ञानिकांनी कोरोना चाचणीसाठी बनवली ‘पेपर स्ट्रिप किट’

कोरोना व्हायरस महामारीचा सामना करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांना त्वरित चाचणीसाठी नवीन किट विकसित करण्यास यश मिळाले आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेशी (सीएसआयआर) संलग्न असलेल्या वैज्ञानिकांनी विकसित केलेली ही पेपर-स्ट्रिप आधारित चाचणी किट आहे.

या किटद्वारे खूप कमी वेळेत संक्रमणाची माहिती मिळेल. आयजीआयबीचे वैज्ञानिक डॉ. सौविक मैती आणि डॉय देबज्योती चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखालील टीमने तयार केलेली ही किट एका तासापेक्षा कमी वेळेत कोरोना व्हायरसच्या व्हायरल आरएनएचा शोध घेईल.

या किटमुळे कोरोना व्हायरसच्या रुग्णांची तपासणी करण्यास मदत होईल. चक्रवर्ती यांच्यानुसार, संक्रमित व्यक्तीमध्ये कोरोनाचे जीनोमिक अनुक्रमची ओळख करण्यासाठी पेपर किटमध्ये जनुकिय संपादनाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्रिस्पर-कॅस-9 चा उपयोग करण्यात आलेला आहे.

वैधता परिक्षण पुर्ण झाल्यानंतर या किटचा उपयोग चाचणीसाठी केला जाईल. याच्या उपयोगासाठी जवळपास 500 रुपये खर्च येईल. वैज्ञानिक या टूलवर मागील 2 वर्षांपासून काम करत आहेत आणि जानेवारीमध्ये चीनमध्ये कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर कोव्हिड-19 चा शोध घेण्यासाठी याचा प्रयोग करण्यात आला.

Leave a Comment