संधोशन : अँटी पॅरासाइट औषधाने 48 तासात नष्ट होतो कोरोना व्हायरस

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, यावर उपचारासाठी जगभरातील वैज्ञानिक औषध शोधत आहेत. आता ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी दावा केला आहे की, एक सर्वसाधारण अँटी-पॅरासाईट औषध कोरोनावरील उपचारासाठी फायदेशीर ठरू शकते.

संशोधकांनी लॅबमध्ये विकसित पेशींवर याचे यशस्वी चाचणी केली. अँटी-पॅरासाईट औषध परजीवीद्वारे होणाऱ्या आजारांवर उपयोगी ठरते.

अँटीव्हायरल रिसर्च या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, लॅबमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या पेशींमधील व्हायरस केवळ 48 तासांत नष्ट करण्यात आले.  संशोधकांना आढळले आहे की आधीपासूनच अस्तित्त्वात असलेल्या एका अँटी-पॅरासाइट औषधाने कोरोना व्हायरस नष्ट केला. उपचाराच्या दिशेने हे एक मोठे यश आहे.

संशोधनानुसार, इव्हरमेक्टिन नावाच्या औषधाचा केवळ एक डोस कोरोना व्हायरससह सर्व व्हायरल आरएनएला 48 तासात नष्ट करतो. जर कमी संक्रमण असेल तर व्हायरस 24 तासात देखील नष्ट होऊ शकतो.

Leave a Comment