उपचारासाठी आलेल्या नर्ससमोर तबलिग्यांचे अश्लील कृत्य


नवी दिल्ली – सध्या जगभरासह देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. पोलीस, डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी अशा परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. तर दुसरीकडे वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत तबलिगीचे संशयित रुग्ण गैरवर्तन करत असल्याची माहिती समोर आली आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत गाझीयाबादमधील एमएमजीमध्ये दाखल करण्यात आलेल्या काही तबलिगींनी गैरवर्तन केल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर तर उपचारासाठी आलेल्या परिचारिकेसमोरही कपडे बदलण्यासारखी कृत्य करण्याचे प्रकार काहींनी सुरू केल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना या घटनेनंतर तुरूंगातील बॅरेकमध्ये बंद करण्यावर विचार सुरू आहे.

रूग्णालयाचे सीएमएलएस रविंद्र राणा यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तबलिगीचे कोरोना संशयित गैरवर्तन करत असल्याची माहिती दिली. सतत या ठिकाणी ते अश्लील कृत्य करत आहेत. तसेच रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तनही करत आहेत. ते छोट्या छोट्या गोष्टींवरून मोठा गोंधळ घालतात. त्याचबरोबर उपचारासाठी आलेल्या परिचारिंकासमोरही कपडे बदलण्यासारखे प्रकार करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या लोकांविरोधात गाझीयाबाद जिल्हा प्रशासनाने तक्रार दाखल करून घेतली आहे आणि त्यांना तुरूंगातील बॅरेकमध्येच बंद करण्यावर विचार सुरू आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत अश्लील वर्तन, गोंधळ घालणे आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment