लॉकडाऊन : मुलीने फुटलेल्या आरशावर बनवली सुंदर डिज्नी पेटिंग

लॉकडाऊनमुळे जगभरात आपआपल्या घरात आयसोलेशनमध्ये आहेत व सोशल डिस्टेंसिंग पाळत आहेत. लॉकडाऊनमुळे लोकांना भरपूर मोकळा वेळ मिळत असल्याने स्वतःमधील कौशल्य, कला दाखवण्याची देखील संधी मिळत आहेत. नवीन जबाबदाऱ्यांमुळे अनेकांनी पेटिंग, डान्सिंग, म्युझिक अशा अनेक गोष्टी सोडल्या आहेत. मात्र आता लॉकडाऊनमुळे मिळत असलेल्या वेळेत अनेकजण ही कला दाखवत आहेत.

अशाच एका लॉकडाऊन असलेल्या मुलीने आपल्या फुटलेल्या आरशाचे रुपांतर सुंदर डिज्नी पेटिंगमध्ये केले आहे. तिची हे पेटिंग ‘टँगल्ड’ या चित्रपटापासून प्रेरित आहे.

सिम नावाच्या ट्विटर युजरने या पेटिंगचे फोटो शेअर केले आहेत.आपल्या क्वारंटाईनच्या 15व्या दिवशी मुलीने हा फोटो ट्विटरवर शेअर केला. यात फुटलेले आरसा आणि त्यानंतर त्यावर काढलेली पेटिंग असे दोन्ही फोटो आहेत व पेटिंग अतिशय सुंदर आहे.

आतापर्यंत या पोस्टला दीड लाखांपेक्षा अधिक जणांनी लाईक केले असून, शेकडो युजर्सने कमेंट्स करत या पेटिंगचे आणि मुलीच्या कलेचे कौतूक केले.

Leave a Comment