लॉकडाऊन : मोबाईलधारकांनी अ‍ॅप्सवर खर्च केले तब्बल 1.78 लाख कोटी

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक शहर लॉकडाऊन आहेत. त्यामुळे लोक घरात बसून मोबाईलवर आपला वेळ घालवत आहेत. लॉकडाऊनमुळे जगभरात 2020 च्या पहिल्या तिमाहीत कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. तसेच मोबाईलवर वेळे घालवणे देखील मागील वर्षीच्या तुलनेत वाढले आहे.

अ‍ॅप एनालिस्ट अ‍ॅप एनीनुसार, जगभरात वर्ष 2020च्या पहिल्या तिमाहीत मोबाईल धारकांनी मोबाईल अ‍ॅपवर तब्बल 1.78 लाख कोटी रुपये (23.4 बिलियन डॉलर) खर्च केले आहेत. यातील 1.26 लाख कोटी रुपये (16.7 बिलियन डॉलर) गेम्सवरच खर्च करण्यात आलेले आहेत.

युजर्सनी आयओएस प्लॅटफॉर्मवर 15 बिलियन डॉलर आणि गुगल प्लेवर 8.3 बिलियन डॉलर्स खर्च केले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत दोन्ही प्लॅटफॉर्मवर युजर्सनी केलेला खर्च 5 टक्क्यांनी वाढला आहे.

अमेरिका आणि चीनच्या युजर्सनी सर्वाधिक खर्च आयओएस प्लॅटफॉर्मवर केला आहे. तर अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांच्या युजर्सनी गुगल प्लेवर सर्वाधिक खर्च केला आहे.

याशिवाय लॉकडाऊनमुळे मागील वर्षीच्या तुलनेत अँड्राईड अ‍ॅप्सवर खर्च केलेला साप्ताहिक वेळ 20 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच, पहिल्या तिमाहीत तब्बल 31 बिलियन नवीन अ‍ॅप देखील डाऊनलोड करण्यात आलेले आहेत.

Leave a Comment