
मुंबई : कोरोनाने देशभरात अशरक्ष: थैमान घातले असून कोरोनाचे 338 रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून त्यापैकी मुंबईचे सर्वाधिक रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान धारावीमध्ये काम सॅनिटाइझचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच आता कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या 52 वर्षांच्या कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वरळीतील हा कर्मचारी रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. बुधवारी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीतील 56 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला होता.
धारावीत सॅनिटाईझ करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच कोरोनाची लागण
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण धारावी भागात आढळून आल्यानंतर बालिगा नगर येथील 300 फ्लॅट्स आणि 90 दुकाने सील करण्यात आली आहेत. त्याचबरोबर तेथील हाय रिस्कमधील नागरिकांना क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आला आहे. या भागातील आजारी नागरिकांची तपासणी केली जात आहे. या भागातील नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. तर बीएमसीकडून खाण्याचे पदार्थ आणि रेशन पुरवले जात आहे. हाय रिस्क असणाऱ्यांच्या चाचणीचा निकाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
