सुसाट कार चालवणाऱ्याला पोलिसांनी पकडले, दिले कोरोनाचे कारण

भारतात लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घरातच थांबावे यासाठी पोलीस आवश्यक ते प्रयत्न करत आहेत. मात्र काही देशांमध्ये चालक रिकाम्या रस्त्याचा फायदा घेत तुफान वेगाने गाडी चालवत आहे. तुफान वेगाने गाडी चालणाऱ्या अशाच एका व्यक्तीला पोलिसांनी पकडल्यानंतर व्यक्तीने सांगितलेले कारण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील एक व्यक्ती निश्चित मर्यादेच्या दुप्पट वेगाने लॅम्बोर्गिनी कार चालवत होता. पोलिसांनी या व्यक्तीला पकडल्यानंतर त्याने आपण कोरोना व्हायरसची तपासणी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जात असल्याचे कारण सांगितले.

ही व्यक्ती तब्बल ताशी 160 किमी वेगाने गाडी चालवत होता. पकडल्यानंतर या व्यक्तीला सेल्फ-आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आलेले आहे. या व्यक्तीला दंड ठोठवण्यात आला असून, त्याचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे.

सहाय्यक आयुक्त मायकेल कॉर्बॉय यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत ड्रायव्हरने वाहतुकीचे नियम मोडू नये. जर तुम्हाला वाटत असेल की कोरोना व्हायरसचे लक्षण आहेत, तर तुम्ही डॉक्टर किंवा हॉस्पिटलची मदत घेऊ शकता. याशिवाय इमर्जेंसी क्रमांकाला फोन करू शकतो.

पोलिसांनी सांगितले की, पकडण्यात आलेल्या व्यक्तीचे वय 35 वर्ष असून, त्याची कोरोना चाचणी करण्यात आली आहे व त्याला सेल्फ-आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे.

Leave a Comment