सावधान ! घरातील या भागांमध्ये लपलेला असू शकतो कोरोना व्हायरस

घराच्या बाहेर पडल्याने कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याची भिती असल्याने लोक घरातच क्वारंटाईन राहत आहेत. मात्र तुमच्या घरात देखील अनेक ठिकाणी कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात लपलेला असू शकतो. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

लाँड्रीहिपच्या सीईओ देयान दिमित्रोव यांच्यानुसार, घरात व्हायरससाठी अनेक गुप्त जागा असतात. आपल्या केसांपेक्षा 900 पट लहान व्हायरस कोठेही लपू शकतो.

Image Credited – Aajtak

देयान यांच्यानुसार, दररोज वापरलेला टॉवेल आपल्यासाठी मोठा धोका असू शकतो. चेहरा, हात, पाय किंवा शरीर पुसण्यासाठी वापरलेल्या टॉवेलवर सर्वाधिक बॅक्टेरिया आणि व्हायरस असतात.

Image Credited – Aajtak

किचन किंवा इतर ठिकाणी काम करताना हातमोजे घालणे चांगली गोष्ट आहे. मात्र हे हातमोजे बॅक्टेरिया आणि व्हायरसचे घर शकतात. त्यामुळे त्यांचा वापर केल्यानंतर ते गरम पाणी किंवा व्हिनेगरच्या मदतीने धुवावेत.

Image Credited – Aajtak

झोपण्यासाठी वापरत असलेल्या उशीचे कव्हर देखील असुरक्षित आहेत. यात व्हायरस लपलेले असू शकतात. त्यामुळे यांना नियमितरित्या बदलावे.

Image Credited – Aajtak

घरातील पायपुसणी अथवा मॅटमुळे संक्रमण पसरू शकते. त्यामुळे यांना देखील स्वच्छ करावे. दररोज परिधान कपड्यांना देखील नियमित धुवावे.

Image Credited – Aajtak

टिव्ही आणि एसीच्या रिमोटला दिवसभरात अनेकांचे हात लागतात. यावर देखील अनेक कीटाणू असतात. त्यामुळे यांना दररोज सॅनिटायझ करावे.

Leave a Comment