जाणून घ्या BS-6 उत्सर्जन नियमाबाबत संपुर्ण माहिती

देशभरात 1 एप्रिलपासून बीएस-6 उत्सर्जन नियम (एमिशन नॉर्म्स) लागू झाले आहेत. प्रदुषण कमी करण्याच्या दृष्टीने हे मोठे पाऊल आहे. या आधी वाहनांमध्ये बीएस-4 उत्सर्जन नियम लागू होते. हे नियम नक्की काय आहेत, याविषयी संपुर्ण माहिती जाणून घेऊया.

बीएस काय आहे ?

सरकार वाहनांद्वारे उत्पादन होणाऱ्या प्रदुषणाला नियंत्रित करण्यासाठी मानक तयार करते. बीएस म्हणजे ‘भारत स्टेज’ म्हटले जाते. हे मानक पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे निश्चित केले जातात.

प्रमूख प्रदूषक –

वाहनांद्वारे कोणते प्रमुख प्रदूषक निर्माण होतात, हे समजणे गरजेचे आहे. पेट्रोल-डिझेल इंजिन प्रामुख्याने कार्बन डाय ऑक्साईड (सीओ 2), कार्बन मोनोऑक्साइड (सीओ), हायड्रोकार्बन (एचसी) आणि नायट्रोजन ऑक्साईड (एनओएक्स) निर्माण करतात. या व्यतिरिक्त, पार्टिकुलेट मॅटर (पीएम) किंवा कार्बन सट डिझेलसोबत डायरेक्ट-इंजेक्शन पेट्रोल इंजिनचे आणखी एक उत्पादन आहे.

बीएस-4 नंतर थेट बीएस-6 का ?

वर्ष 2000 मध्ये सर्वात प्रथम भारतात इंडिया 2000 नावाने उत्सर्जन नियम लागू झाले. त्यानंतर, बीएस-2 वर्ष 2005 आणि बीएस-3 वर्ष 2010 मध्ये लागू केले गेले. 2017 मध्ये बीएस 4 उत्सर्जन नियम लागू झाले. वाढत्या प्रदूषणाची पातळी आणि दीर्घ अंतर लक्षात घेता बीएस-5 सोडून थेट बीएस-6 उत्सर्जन नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बीएस-4 आणि बीएस-6 उत्सर्जन मर्यादेमध्ये काय फरक ?

बीएस 6 उत्सर्जन नियम सक्त आहेत. बीएस 4 च्या तुलनेत NOx ची पातळी पेट्रोल इंजिनसाठी 25 टक्के आणि डिझेल इंजिनसाठी 68 टक्के कमी आहे. याव्यतिरिक्त डीजल इंजनसाठी एचसी+ NOxची मर्यादा 43 टक्के आणि पीएमची मर्यादा 82 टक्के कमी करण्यात आली आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी बीएस 6 कम्प्लांट इंजिनमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

बीएस-4 वाहने बीएस-6 इंधनाद्वारे चालणार ?

याचे उत्तर हो असे आहे. बीएस-6 इंजिन असलेल्या गाड्या बीएस-6 इंधनावर सहज चालतील. डिझेल इंजिनमध्ये, इंधनाचीस सल्फरचे सामग्री प्रमाण इंजेक्टरसाठी लुब्रिकेंट म्हणून कार्य करते. बीएस-4 इंधनाच्या तुलनेत बीएस-6 इंधनात सल्फरचे प्रमाण पाच पट कमी आहे. यामुळे, लुब्रिकेंट नसल्यामुळे नंतर इंधन इंजेक्टरमध्ये समस्या येऊ शकते.

बीएस-6 वाहने बीएस-4 इंधनावर चालतील ?

हे देखील बीएस-6 इंजिन सारखेच आहे. पेट्रोल इंजिनमध्ये काहीही समस्या येणार नाही. कारण याचे इंधन कंपोजिशन जास्त वेगळे नाही. मात्र डिझेल इंजिनमध्ये समस्या येऊ शकते.

बीएस-4 गाड्यांचे काय होणार ?

1 एप्रिलपासून बीएस-6 उत्सर्जन नियम लागू झाल्याने बीएस-4 गाड्यांचे उत्पादन बंद होईल. या गाड्यांची विक्री आणि रजिस्ट्रेशन देखील बंद होईल. मात्र आता लॉकडाऊनमुळे सर्वोच्च न्यायालयाने या गाड्यांच्या विक्रीसाठी कंपन्यांना 10 दिवसांची मुदतवाढ दिली असून, कंपन्या 24 एप्रिल 2020 पर्यंत बीएस-4 गाड्यांची विक्री करू शकतात.

Leave a Comment