राज्यातील कोरानाग्रस्तांच्या आकड्यात ७ नव्या रुग्णांची वाढ


मुंबई – राज्यात ७ नवे कोरोनाग्रस्त आढळल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १९३ झाली आहे. सात रुग्णांपैकी ४ मुंबईतील तर पुणे, नागपूर आणि सांगली या तीन शहरांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. या संदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर देश १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन आहे.

संसर्गाद्वारे कोरोनाचा प्रादुर्भाव हा होतो. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि शक्यतो घराबाहेर पडू नका असे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे. कोरोनाबाबत किंवा इतर महत्त्वाच्या विषयांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील जेव्हा बैठका घेतात तेव्हा सोशल डिस्टन्सिंग पाळताना दिसतात. त्यासंदर्भातील फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. आता महाराष्ट्रातील रुग्णसंख्या १९३ वर गेली आहे. त्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाने अधिकाधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

Leave a Comment