लॉकडाऊन : पोलिसांच्या काठीपासून वाचण्यासाठी या पठ्ठ्याने शोधला जुगाड

कोरोना व्हायरसमुळे भारत 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकाला अत्यावश्यक सेवा सोडून इतर कारणांसाठी बाहेर फिरण्यास बंदी आहे. अशा परिस्थितीतही बाहेर फिरणाऱ्यांना पोलीस कर्मचारी चांगलीच अद्दल घडवत आहे. बाहेर फिरणाऱ्यांना पोलीस शिक्षा देत आहेत. मात्र आता एका टीक-टॉक युजरने पोलिसांच्या काठीपासून वाचण्यासाठी खास जुगाड शोधला आहे.

टीक-टॉकवर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला देखील हसू येईल.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की एका मुलाने गाडीवर बाहेर जाताना गळ्यात एक बोर्ड लटकवला आहे. या बोर्डवर लिहिले आहे की, कृपया लाठी चार्ज करू नका. रेशन आणण्यासाठी जात आहे.

@ravi_k143Come##back##home##safly##indian

♬ original sound – Ravi_k143

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना पोलिसांच्या काठीचा चांगलाच प्रसाद मिळत आहे. मात्र आता या पठ्ठ्याने शोधलेल्या जुगाडामुळे पोलिसांच्या काठीपासून काही प्रमाणात वाचण्यास नक्कीच मदत होईल.

Leave a Comment