संपूर्ण देशात आज रात्री 12 पासून लॉकडाऊन; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भामुळे आज रात्री 12 वाजल्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात येईल. तसेच पुढील 21 दिवस लॉकडाऊन कायम लागू राहिल, अशी मोठी घोषणा केली आहे. मी तुम्हाला देशाचा पंतप्रधान म्हणून नाही तर तुमच्या परिवाराचा सदस्य म्हणून विनंती करत आहे, की पुढील 21 दिवस काहीही करु नका. फक्त आणि फक्त घरात बसा, असे मोदी म्हणाले.

प्रत्येक नागरिकाला आपला देशाला वाचवण्यासाठी हा निर्णय लागू असेल. आज रात्री 12 वाजल्यापासून घराबाहेर पडण्यास मज्जाव असेल. हा एकप्रकारचा कर्फ्यूच असल्याचे मोदी म्हणाले. आपल्या घराबाहेर लक्ष्मण रेखा आखून घ्या. रेषा ओलांडाल तर कोरोनासारखा महाभयंकर रोग घरी घेऊन याल. त्यामुळे घरातून बाहेर पडू नका, अशी विनंती त्यांनी देशवासियांनी केली आहे. देशात आज तुम्ही जिथे असाल तिथेच राहा, पुढील 21 दिवस तिथून हलू नका, असंही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आज दुसऱ्यांदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले आहे. सगळ्या देशवासियांनी जनता कर्फ्यूला सफल केले. त्यांच्या उस्फूर्त सहभागाने जनता कर्फ्यू यशस्वी झाला. तसेच देशावर संकट आल्यावर सगळे एकत्र येतात, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली. सोशल डिस्टसिंग ठेवणे हाच कोरोनाला रोखण्याचा अंतिम मार्ग आहे. या रोगाला हरवण्याचा विलगीकरण हाच एकमेव उपाय आहे. सामान्यांपासून पंतप्रधानालादेखील हाच उपाय असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

Leave a Comment