लॉकडाऊन : जाणून घ्या काय सुरू आणि काय बंद ?

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर नागरिकांच्या मनात जरूरी सेवा आणि औषधे मिळणार की नाही याविषयी शंका निर्माण झाली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जरूरी सेवा आणि औषधे उपलब्ध राहतील. केंद्र आणि राज्य सरकार सोबत मिळून काम करतील, जेणेकरून लोकांना गरजेच्या वस्तू उपलब्ध होतील. केंद्र सरकारने लॉकडाऊन दरम्यान सुरू असलेल्या गरजेच्या वस्तूंची गाइडलाइन जारी केली आहे.

या सेवा राहणार सुरू –

औषधे, राशन, दूध, पेट्रोल पंप, वीज, गॅस सेवा, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, बँक, डॉक्टरांकडे जाण्याची परवानगी, सीएनजी आणि इंटरनेट सेवा सुरू राहतील.

या सेवा राहणार बंद –

व्यावसायिक वाहन, बस, रेल्वे, मॉल, हॉल, जिम, स्पा, स्पोर्ट्स क्लब, सर्व फॅक्ट्री, वर्कशॉप, गोदाम, सर्व सरकारी कार्यालय बंद राहतील.

हे विभाग राहणार सुरू –

पोलीस, सुरक्षा विभाग, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, आपत्ती व्यवस्थापन, राजकोष, वीज उत्पादन आणि ट्रांसमिशन यूनिट, टपाल कार्यालय, होमगार्ड, सिव्हिल डिफेंस, फायर आणि इमर्जेंसी सर्व्हिस, कारागृह, जिल्हा प्रशासन, पाणी विभाग सुरू राहतील.

याशिवाय खाजगी वाहने केवळ राशन, दूध, भाजी आणि वैद्यकीय गरज असेल तरच वापरता येतील.

Leave a Comment