कोरोना : मृतांची खरी आकडेवारी लपवत आहे चीन ?

मागील तीन महिन्यांपासून कोरोना व्हायरसने चीनमध्ये थैमान घातले आहे. चीनच्या सरकारनुसार, आतापर्यंत 81,093 जणांना या व्हायरसची लागण झाली आहे. तर 3,270 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र सोशल मीडियावर दावा करण्यात येत आहे की चीन सरकार कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा लपवत असून, हा आकडा 2 कोटींपेक्षा अधिक आहे.

अनेक चीनच्या नागरिकांनी सोशल मीडियावर दावा केला आहे की चीन सरकार मृतांचा आकडा लपवत आहे. तसेच मागील तीन महिन्यात मोबाईल युजर्सची संख्या 2.1 कोटींनी कमी झाली आहे.

काही दिवसांपुर्वी मोबाईल युजर्सबाबत चीनच्या सरकारी मासिकाने आकडेवारी जाहीर केली होती. यात मागील तीन महिन्यात चीनमधील मोबाईल युजर्सची संख्या 2.1 कोटींनी कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. जानेवारी-फेब्रवारी महिन्यात चायना मोबाईलचे 80 लाख युजर्स, चायना युनिकॉर्नचे 78 लाख आणि चायना टेलिकॉमचे 56 लाख युजर्स कमी झाले आहेत.

रिपोर्टनुसार, चीनमध्ये शाळा बंद असल्याने विद्यार्थी फोनद्वारे ऑनलाईन क्लासेस घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांनी नवीन फोन घेतल्याची शक्यता आहे. याशिवाय चीनमध्ये लाखो निर्वासित काम करतात. जानेवारीमध्ये चायनीज नवीन वर्षाला हे नागरिक आपल्या घरी परतले असतील व ट्रॅव्हल बॅनमुळे ते परतले नसल्याने तेथील नंबर बंद झाला असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याशिवाय रिपोर्टमध्ये आणखी एक शक्यता वर्तवण्यात आली आहे. यानुसार, मोबाईल वापरत नसल्याने मृतांचा आकडा अधिक आहे, असे होत नाही. लॉक डाउन दरम्यान आर्थिक स्थितीमुळे अनेकांनी आपल्याकडील अतिरिक्त फोन बंद केले असावे.

याशिवाय चीन मृतांचे आकडे लपवत असल्याचे वृत्त दिल्यानंतर वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन जर्नलच्या पत्रकाराने चीनने बाहेर काढले होते. अद्यापतरी चीनमधील मृतांची संख्या अधिक असल्याचे सत्य समोर आलेले नाही, त्यामुळे सोशल मीडियावर करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे समोर येत आहे.

Leave a Comment