व्हिडीओ : जवानाने बनवली खास ‘हँड्रस फ्री सॅनिटायझिंग मशीन’

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी नागरिकांना वारंवार हात धुण्याचे व सॅनिटायजरचा वापर करण्यास सांगितले जात आहे. प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने या व्हायरसपासून वाचण्यासाठी प्रयत्न करत आहे. सध्या भारतीय सैन्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एका मशीनबद्दल सांगण्यात आले आहे, जी विना स्पर्श करत पाणी व सॅनिटायझर उपलब्ध करते.

या मशीनला पायाने ऑपरेट केले जाते व हात धुवता येतात. यासाठी पाणी व सॅनिटायझर घेण्यासाठी हाताने स्पर्श करावे लागत नाही.

भाजप खासदार गौतम गंभीर यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, इनोव्हेशन भारतीय सैन्याचे नाव आहे. सुपरकूल हँड सॅनिटायझिंग मशीन. शानदार काम ! व्हिडीओमध्ये सैन्याचा जवान मशीनबाबत माहिती देताना दिसत आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत 42 हजारांपेक्षा अधिक युजर्सनी पाहिले असून, शेकडो यूजर्सनी भारतीय सैन्याचे कौतूक केले आहे.

Leave a Comment