शहरातून आलेल्या माणसांप्रती माणुसकी दाखवा वागा; राजेश टोपे यांचे आवाहन


मुंबई : राज्यासह देशभरातील अनेक नागरिकांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता आपल्या गावची वाट धरली आहे. पण, शहराकडून गावाकडे स्थलांतर करणाऱ्या लोकांना ग्रामस्थांकडून विरोध होताना दिसत आहे. आपले राज्य सुसंस्कृत राज्य असल्यामुळे गावाकडे परत आलेल्या नागरिकांसोबत माणुसकीचे वर्तन झाले पाहिजे, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. गावात येणारी माणसे ही आपलीच असून कोणत्याही बाधित देशातून ते आलेले नाही. त्यामुळे त्यांच्याशी सौजन्याने वागण्याची विनंती टोपे यांनी केली. राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

राज्य सरकारने कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहून राज्यात सोमवारी संचारबंदी लागू केली. पण शहरी भागात अजूनही गर्दी कमी होताना दिसत नसल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. आपल्याला ऐकमेकांमध्ये अंतर राखणे गरजेचे असल्यामुळे सरकारच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. मागील काही दिवसांत गावाकडे जाणाऱ्या लोकाचे प्रमाण वाढल्यामुळे गावकरी अशा लोकांकडे संशयाच्या नजरेने पाहत आहेत. तर, अनेक ठिकाणी गावांनी आपल्या सीमा बंद केल्याचे पाहायला मिळाले आहे. यावर गावात आलेले लोक पण आपलेच आहेत. त्यांच्याशी माणुसकीने वागण्याचा सल्ला राजेश टोपे यांनी दिला. अशा लोकांमध्ये काही लक्षणे आढळल्यास त्यांना रुग्णालयात घेऊन जावे पण गावात येऊन देणार नाही, अशी भूमिका घेणे हे राज्याच्या संस्कृतीला शोभ देणारे नसल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment