कनिकाच्या संपर्कात आलेल्या 162 जणांपैकी 63 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह


बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला स्वतःच्या बेजबाबदारीपणामुळे कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर देशभरात खळबळ माजली आहे. नेटकऱ्यांनी तिला तिच्या बेजबाबदारपणासाठी ट्रोल केले. त्याचबरोबर तिच्याबाबत अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्याम लंडनवरून परतल्यावर कनिकाने काही पार्ट्यांमध्ये हजेरी लावल्यामुळे तिच्यासोबत असलेल्या बाकीच्या लोकांचाही जीव टांगणीला लागला आहे. या पार्टीमध्ये तिच्यासोबत राजकीय नेते, काही कलाकार उपस्थित होते. यामध्ये जवळपास 162 लोकांचा समावेश आहे. यादरम्यान आता कनिका कपूरच्या पाहुण्यांबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नुकत्याच मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार कनिका कपूरसोबत त्या पार्टीत उपस्थित असलेल्या 162 लोकांपैकी 120 ते 130 लोकांच्या सॅम्पल टेस्ट घेण्यात आल्या होत्या. त्यातील 63 लोकांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार कोरोना व्हायरस 63 लोकांच्या सॅम्पलमध्ये आढळला नाही. हे ऐकून हैराण व्हाल की 162 लोकांपैकी 32 जण फक्त कानपूरचे होते. या लोकांना भेटण्यासाठी कनिका कपूर कानपूरला गेली होती. कनिका कपूरच्या या वर्तुणूकीमुळे तिच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आता तेच लोक तिच्यावर खूप वैतागले आहेत. दरम्यान असेही सांगितले जात आहे की जिथे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाची थांबवण्याची व्यवस्था केली होती, त्याच हॉटेलमध्ये कनिका कपूर देखील थांबली होती. तसे या वृत्ताला आतापर्यंत बीसीसीआयने दुजोरा दिलेला नाही.

Leave a Comment