घनदाट दाढीमुळे कोरोना व्हायरसचा धोका ?

तुमची दाढी चेहऱ्याला खास लूक देत असली तरी, व्हायरसचा संपर्कात येण्याची शक्यता अधिक असल्याचे आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे. दाढी आणि मिशांमुळे व्हायरसच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे. भलेही दाढी नसल्याने तुम्ही चांगले दिसत नसाल, मात्र मोठ्या दाढीपेक्षा दाढी नसणे तुम्हाला सुरक्षित ठेवते.

रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने जारी केलेल्या इंफोग्राफिक्समध्ये सांगितले आहे की, वेगवेगळी दाढीची स्टाइल फेस मास्कचा प्रभाव कसा कमी करते. हा चार्ट 2017 चा आहे. मात्र कोरोना व्हायरसच्या प्रसारानंतर पुन्हा एकदा हा चार्ज जारी करण्यात आला आहे.

दाढी नसलेला चेहरा अशा परिस्थितीत चांगला आहे. याशिवाय क्लिन शेव, विस्कर्स, सोल पॅटचेस अथवा मिशा असल्यातरी चालतील, जेणेकरून मास्क व्यवस्थित चेहऱ्यावर बसेल.

Image Credited – Economictimes

तुमच्या चेहऱ्यावर जेवढे अधिक केस असतील, तेवढा मास्क व्यस्थित बसणार नाही. फुल बिअर्ड, स्टब्बल, मट्टन चॉप्स अर्थात घनदाट केस असलेली दाढी ठेऊ नये.

सीडीसीने या संदर्भात 12 स्टाइल सुचवल्या आहेत. यात क्लिन शेव, सोल पॅट्च, साइड व्हिस्कर्स, पेन्सिल अशा स्टाईलचा समावेश आहे.

सीडीसीनुसार, चेहऱ्यावरील केस फिल्टरचे काम करत नाहीत. हे केस दाट नसतात व बारीक कणांना रोखू शकत नाहीत. चेहऱ्यावर केस असल्याने मास्क लीकेजचे प्रमाण 20 वरून 1000 पट अधिक वाढते.

Leave a Comment