स्वतःहून आयसोलेट झाला विदेशातून परतलेला प्रभास


दक्षिण भारतीय चित्रपटांचा सुपरस्टार प्रभासने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर स्वतःला आयसोलेट केले आहे. नुकत्याच एका चित्रपटाचे शूटींग पूर्ण करून बाहुबली फेम प्रभास जॉर्जियाहून परत आला आहे आणि म्हणूनच त्याने स्वत: ला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर या संदर्भात प्रभासने पोस्ट करुन याबद्दलची माहिती दिली आहे. दरम्यान अनेक प्रसिद्ध व्यक्ती विदेशातून आल्यावर माहिती लपवून ठेवून लोकांध्ये मिसळताना दिसत आहे. अशा परिस्थिती प्रभासच्या या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

शनिवारी सोशल मीडियावर प्रभासने याबाबतची माहिती देताना, परदेशात शुटींग करुन सुरक्षित परत आल्यानंतर कोरोनाचा वाढता धोका पाहात मी स्वत: ला वेगळे ठेवण्याचे ठरविले आहे. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक खबरदारी घेत आहात. परदेशातून परत आल्यानंतर अनुपम खेर आणि शबाना आझमी यांच्यासह अनेक भारतीय सेलिब्रिटींनी स्वत: ला वेगळे केले आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनीही सोमवारी सांगितले, की कोरोना व्हायरसमुळे कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळण्यासाठी त्यांनी स्वत:ला पूर्णपणे वेगळे केले आहे. 97 वर्षीय अभिनेत्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.

Leave a Comment