सावधान ! ‘कोरोना व्हायरस डिस्काउंट’च्या नावाखाली होऊ शकते फसवणूक

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोक आपल्या घरात कैद आहेत. याच पार्श्वभुमीवर हॅकर्स देखील लोकांना आपला निशाणा बनवत आहेत. हॅकर्स कोरोना व्हायरसचा फायदा घेऊन लोकांची फसवणूक करत आहेत.

सायबर सिक्युरिटी कंपनी चेकप्वाइंटनुसार, हॅकर्स कोरोना व्हायरसच्या नावाखाली अनेक स्पेशल ऑफर्स चालवत आहेत. हॅकर्स डिस्काउंट कोडसाठी ‘COVID19’ चा वापर करत आहेत. हे गुन्हेगार मॅकबुकसारखे प्रिमियम प्रोडक्ट्स अगदी कमी किंमतीत विकण्याचा दावा करत आहेत.

चेकप्वाइंटनुसार, जानेवारी महिन्यापासून ते आतापर्यंत कोरोना व्हायरससंबंधी 16 हजार डोमेन रजिस्टर्ड झाले आहेत. यातीलल 50 टक्के डोमेन बनावट असून, याद्वारे मालवेअर पसरण्याचा धोका आहे. हॅकर्स कोरोनाच्या नावाखाली स्पॅम ई-मेल पाठवून हॅक करण्याचा देखील प्रयत्न करत आहेत.

कोरोना व्हायरस डिस्काउंटच्या नावाखाली महागड्या वस्तू कमी किंमतीत विकण्याचा दावा केला जात असून, याद्वारे फसवणूक केली जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या नावाखाली आलेल्या कोणत्या ईमेल अथवा लिंकवर क्लिक करण्याची चूक करू नये.

Leave a Comment