देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली असून, आतापर्यंत 300 पेक्षा अधिक जणांना या व्हायरसची लागण झाली आहे. याच पार्श्वभुमीवर आयआयटीच्या संशोधकांनी कोरोना टेस्टची एक नवीन पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीमुळे कोरोना टेस्ट करण्यासाठी खूप कमी खर्च येईल. सध्या याची तपासणी नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी करत आहेत.
कोरोना : आयआयटीच्या संशोधकांनी तयार केली स्वस्त चाचणी पद्धत
आयआयटी दिल्लीच्या कुसूम स्कूल ऑफ बायोलॉजीकल सायन्सच्या संशोधकांनी ‘प्रोब-फ्री डिटेक्शन एसे’ तयार केले आहे. सध्या याला कॉलेजच्याच लॅबमध्ये टेस्ट करण्यात येत असून, पुढील परवानगीसाठी पाठवण्यात आलेले आहे. व्हायरसचा प्रसार वेगाने होत असल्याने, याच्या चाचणीसाठी मोठ्या प्रमाणात किटची आवश्यकता आहे.
काही खाजगी हॉस्पिटल्सला देखील कोरोनाची चाचणी करण्याची परवानगी मिळाली आहे. कोरोना चाचणीसाठी शुल्क 4,500 रुपयांपेक्षा अधिक नसेल, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. ज्या खाजगी लॅबकडे NABL मान्यता असेल, ते ही चाचणी करू शकतील.
आयआयटी संशोधकांचे म्हणणे आहे की, त्यांच्या या पद्धतीमुळे कोरोनाची चाचणी करणे खूपच स्वस्त होईल व प्रत्येकजण स्वतःची चाचणी करू शकेल. सध्या ही टीम एनआयव्हीकडून परवानगी मिळवण्याची वाट पाहत आहे.