इंदुरीकर महाराजांचे जनता कर्फ्यूला सहकार्य करण्याचे आवाहन


पुणे – हभप इंदुरीकर महाराज यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कोरोना संदर्भातील आवाहनाला सर्वांनी सहकार्य करा. आपले गाव, आपले, शहर, आपला देश यातून मुक्त करायचा असेल तर हे कुणा एकट्याचे व प्रशासनाचे काम नसून सर्वांचा लढा असल्याचे वक्तव्य केले आहे.

इंदुरीकर महाराज यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यातील 63 जणांना कोरोना सारख्या आजाराने बाधित केले आहे. त्यामुळे आपले गाव, आपले शहर, आपला देश मुक्त यातून करायचा असेल तर प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे व ती गरजेचे आहे. हा कोण्या एकट्या दुकट्या व निव्वळ शासन, प्रशासनाचा नाही तर सर्वांचा लढा आहे, तेव्हा सर्वांनी खबरदारी घ्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करा.

कोरोना विषाणूपासून प्रत्येकाने आपण आपले कुटुंब दूर ठेवा. घराबाहेर पडू नका, प्रवास टाळा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्या व शासनाला सहकार्य करा. मी पण घरी आहे तुम्ही पण बाहेर पडू नका, असे इंदुरकर महाराज यांनी म्हटले आहे. दिनांक 31 मार्चपर्यंत सर्व कीर्तनाचे कार्यक्रम इंदुरकर महाराज यांनी रद्द केले आहेत.

Leave a Comment