धक्कादायक ! महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यावर


मुंबई : ज्यासाठी राज्य सरकार राज्यातील नागरिकांनी अधिक सावध व्हावे यासाठी धडपड करत आहे, तेच संकट आता राज्यावर ओढावतानाचे चित्र सध्या दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र असल्याचे खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत सावध केले आहे.

यासंदर्भातील वृत्त आयबीएन लोकमत या वृत्त वाहिनीने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 63 वर पोहोचली असून रुग्णांचा हा वाढता आकडा पाहता महाराष्ट्र कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचतो आहे, असा सूचक इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील कोरोना ग्रस्तांची संख्या 52 वरुन 63 वर पोहोचली आहे. मुंबईत 10 नवीन रुग्ण आढळले आहे. तर एक जण पुण्यात आढळला आहे. मुंबईत विदेशातून आलेले 8 रूग्ण तर संसर्गातून तिघांना लागण झाली आहे. त्यामुळे राज्यात 11 रुग्णांची वाढ झाली आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली. आतापर्यंत आढळलेल्या 63 रुग्णांपैकी 12 ते 14 जणांना संर्गातून कोरोनाची लागण झाली आहे तर उर्वरित कोरोनाबाधित हे परदेशातून आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment