उद्या राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाच्या शाखा भरणारच


नागपूर: देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये, ट्रेन, मेट्रो, मॉल, बाजारपेठा, धार्मिक स्थळं बंद करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या (२२ मार्चला) कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. जनता कर्फ्यू सकाळी ७ ते रात्री ९ असे १४ तास पाळला जावा, असे मोदींनी म्हटले आहे.

पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा या दिवशीदेखील सुरूच राहणार आहेत. संघाच्या शाखांची उद्या वेळ बदलण्यात येईल, अशी माहिती संघाने ट्विटरवरुन दिली आहे. रविवारी होऊ घातलेला जनता कर्फ्यू पाहता, सकाळी साडे सहाच्या आधी किंवा रात्री साडे नऊच्या नंतर शाखा सुरू होईल, असे आरएसएसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे.


हे ट्विट संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हवाल्याने करण्यात आले आहे. २२ मार्चचे माननीय पंतप्रधानांचे जनता कर्फ्यूचे आवाहन लक्षात घेता त्या दिवशी शाखा सकाळी साडे सहाच्या आधी किंवा रात्री ९.३० च्या नंतर होतील. आपापल्या विभागात किंवा सोसायटीत काही स्वयंसेवक एकत्र येऊन प्रार्थना करू शकतात, असे ट्विटमध्ये संघाने म्हटले आहे.

Leave a Comment