व्हायरल; चेंडू टाकल्यानंतर गोलंदाजाने केली विचित्र हरकत

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील विचारात पडाल की खेळाडू क्रिकेट खेळत आहे की फुटबॉल ?

चेंडू टाकल्यानंतर गोलंदाज चेंडूसह जगलिंग करताना दिसला. खेळाडूने चक्क फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोप्रमाणे चेंडूसह जगलिंग केले. गोलंदाजाची ही विचित्र हरकत बघून भारताचे माजी क्रिकेट आकाश चोप्रा देखील हैराण झाला.

आकाश चोप्राने ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, फलंदाजाने चेंडू डिफेंस केल्यानंतर चेंडू गोलंदाजाकडे येतो. त्यानंतर गोलंदाज एखाद्या फुटबॉलपटूप्रमाणे त्या चेंडूशी जगलिंग करतो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून, आतापर्यंत 50 हजारांपेक्षा अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. शेकडो युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Comment