कोरोना : मुलाच्या परदेशवारीची माहिती लपवल्यामुळे रेल्वे कर्मचारी निलंबित

दक्षिण पश्चिम रेल्वेने आपल्या एका महिला कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. महिला कर्मचाऱ्याने आपल्या मुलाची इटलीवरून परतल्याची माहिती लपवली होती. ही माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यावर कारवाई केली असून, मुलाला आयसोलेशनमध्ये ठेवले आहे.

रेल्वे प्रवक्ते ई-विजया यांनी सांगितले की, महिला अधिकारीने आपल्या मुलाची जर्मनीवरून परतल्याची माहिती दिली नाही व मुख्य बंगळुरू रेल्वे स्टेशन येथील अतिथीगृहात ठेऊन इतरांचे प्राण देखील धोक्यात आणले.

रेल्वे प्रवक्त्यांनी सांगितले की, 25 वर्षीय युवक स्पेनवरून जर्मनीला आला होता. 13 मार्चला बंगळुरू येथील विमानतळावर पोहचल्यानंतर त्याला घरातच राहण्यास सांगण्यात आले होते. 18 मार्चला त्याला संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

महिलेने सर्वांपासून लपवून ऑफिसर्स रेस्ट हाउसमध्ये मुलाची राहण्याची सोय केली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर रेस्ट हाउसला बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment