लॉकडाउन झालेल्या आजोबांना नातीने अशी दाखवली इंगेजमेंटची अंगठी

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांनी स्वतःला घरात बंद करून घेतले आहे. या पार्श्वभुमीवर अनेक भावूक करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या असाच एक फोटो एका आजोबा व नातीचा व्हायरल होत आहे. आजोबांना कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये वेगळे ठेवण्यात आलेले आहे. नात त्यांना आपल्या इंगजमेंटची अंगठी दाखवत आहे.

या मुलीचे नाव कॅर्रेल बॉयड असून, तिने सांगितले की, सर्वात प्रथम आजोबानाच साखरपुड्याविषयी माहिती द्यायची होती. त्यामुळे ती थेट आपल्या आजोबांकडे गेली. हॉस्पिटलला विनंती केल्यानंतर अखेर त्यांनी खिडकीमधून त्यांच्याशी संवाद साधण्यास परवानगी दिली.

Image credited -navbharattimes

तिने सांगितले की, तिच्या आजोबाकडे फोन नसल्याने ती थेट बोलू शकत नाही. याच कारणामुळे ती त्यांना भेटायला गेली.

आजोबांना इंगेजमेंटची अंगठी दाखवल्यानंतर ते देखील भावूक झाले. त्यांनी हॉस्पिटलच्या स्टाफला हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यास देखील सांगितले. आजोबा-नातीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Leave a Comment