सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दीपिकाचा बीचवरील हा फोटो


सध्या सोशल मीडियावरील अभिनेत्री दीपिका पादुकोणचा एक फोटो खूप चर्चेत आहे. चाहत्यांनी या फोटोवर कॉमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. सध्या बिकनीमध्ये पोज देत असतानाचा हा फोटो व्हायरल झाला आहे.


दीपिकाचा अलिकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ती यात जीममध्ये आपल्या ट्रेनरसोबत गंभीरपणे व्यायाम करीत असताना दिसली होती. पण या व्हिडीओत मागे चेन्नई एक्सप्रेसमधील शाहरुख आणि दीपिकाच्या लुंगी डान्स गाण्याचा आवाज सुरू होतो आणि दीपिका व्यायामाच्या मध्येच ताल धरताना दिसते. सोशल मीडियावर या व्हिडिओचीही भरपूर चर्चा झाली होती.


या वर्षाच्या सुरुवातीलाच अभिनेत्री दीपिका पादुकोणचा ‘छपाक’ हा चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट लक्ष्मी अग्रवाल यांच्या सत्यकथेवर आधारित होता. अ‌ॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिलेची, ही प्रेरणादायी कथा प्रेक्षकांच्या मनाला भावली. बॉक्स ऑफिसवर ‘छपाक’ने ३२.४८ कोटीचा गल्ला जमवला.


आगामी ‘८३’ या चित्रपटात दीपिका झळकणार आहे. १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या विश्वकरंडकाची ही रोमहर्षक कथा आहे. यात कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंह साकारत असून कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका दीपिका करीत आहे.

Leave a Comment