मोहनलाल यांच्या ‘मारक्कर-लायन ऑफ द अरेबियन सी’चा हिंदी ट्रेलर रिलीज


नुकताच ‘मारक्कर-लायन ऑफ द अरेबियन सी’ या भव्य चित्रपटाचा हिंदी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सुपरस्टार मोहनलाल मूळ मल्याळम भाषेत असणाऱ्या या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये डोळ्यात न मावणारी अतिभव्य दृष्य दिसतात. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट एक युद्धपट आहे. या चित्रपटात अरबी समुद्राचा अनभिषक्त सम्राट असलेल्या कुंजली मारक्कर या योध्याची कथा दाखवण्यात येणार आहे.

हा अनेक हिट चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट असून अंथोनी पेरुम्बवूर निर्माता असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आशीर्वाद सिनेमाज या बॅनरने केली आहे. मोहनलाल यांच्यासह ‘मारक्कर-लायन ऑफ द अरेबियन सी’ या चित्रपटात प्रणव मोहनलाल, अर्जुन, सुनिल शेट्टी, प्रभू, मंजू वारियर, सुहासिनी, किर्ती सुरेश, कल्याणी प्रियदर्शन, फैजील, सिद्दीकी, अशोक सेल्वन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २६ मार्च २०२०ला ‘मारक्कर-लायन ऑफ द अरेबियन सी’ हा चित्रपट देशभर वेगवेगळ्या भाषेत रिलीज होणार आहे.

Leave a Comment