8 वर्षीय मुलीने नाकारला मोदींनी दिलेला सन्मान

8 वर्षीय पर्यावरणवादी लिसिप्रिया कंगुजमने महिला दिनानिमित्ताने पंतप्रधान मोदींनी दिलेला सन्मान नाकारला आहे.

8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने भारत सरकारकडून ट्विटवर #SheInspiresUs वापरून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांविषयी ट्विट करण्यात येत आहे. यावेळी @mygovindia ट्विटर अकाउंटवर लिसिप्रियाविषयी देखील ट्विट करण्यात आले.

@mygovindia वरून ट्विट करण्यात आले की, लिसिप्रिया एक पर्यावरण कार्यकर्ता आहे. वर्ष 2019 मध्ये तिला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बाल पुरस्कार, आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्कार आणि भारत शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिच्यासारख्या कोणाला तुम्ही ओळखता का? #SheInspiresUs वापरुन आम्हाला याबाबत कळवा.

भारत सरकारच्या या ट्विटला उत्तर देताना लिसिप्रियाने हा सन्मान स्विकारण्यास नकार दिला.

तिने पंतप्रधान मोदींना टॅग करत लिहिले की, प्रिय नरेंद्र मोदीजी, जर तुम्ही माझा आवाज ऐकू शकत नाही. तर कृपया मला सेलिब्रेटी बनवू नका. तुमच्या #SheInspiresUs उपक्रमांतर्गत अनेक प्रेरणादायी महिलांमध्ये माझा समावेश करण्यासाठी धन्यवाद. खूप विचार केल्यानंतर मी हा सन्मान नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. जय हिंद !

तिने एकामागोमाग अनेक ट्विट करत पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी पावले न उचलल्याने खासदारांवर टीका केली.

लिसिप्रियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदारांकडे हवामान बदल कायदा करण्याची देखील मागणी केली.

Leave a Comment