आता चक्क फणसाद्वारे चार्ज होणार स्मार्टफोन

फणस आणि काही अन्य फळांद्वारे स्मार्टफोन चार्जिंग करता येईल, असा दावा सिडनी यूनिवर्सिटीमधील संशोधकांनी केला आहे. संशोधकांच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, एका तंत्रज्ञानाद्वारे फणसासारख्या फळांद्वारे मोबाईल चार्ज करणे शक्य आहे. फणसासारख्या फळणांच्या कचऱ्याद्वारे वेगाने वीज निर्मिती करणे शक्य आहे व याद्वारे फोन, लॅपटॉप आणि टॅबलेट सारखे डिव्हाईस काही सेंकदात चार्ज करणे शक्य आहे.

प्रोफेसर विंसेंट गोम्स यांनी अहवालात सांगितले की, कशाप्रकारे त्यांना उष्णकटिबंधीय फळांचे सुपर-कॅपेसिटरमध्ये रुपांतर करण्यात यश आले. सुपर कॅपेसिटर हे उर्जा जलाशयांसारखे आहे जे योग्य पद्धतीने उर्जाला बाहेर काढते.

ते एका छोट्या बॅटरीच्या आकाराच्या उपकरणात उर्जा साठवू शकतात व नंतर इलेक्ट्रिक उपकरणांना उर्जा प्रदान करू शकतात.

विंसेंट गोम्स म्हणाले की, फणसाचा कचरा एक स्थायी स्त्रोत आहे. जे कचऱ्याला एका उत्पादनात परावर्तित करू शकते. यामुळे रासायनिक-मुक्त, ग्रीन सिंथेसिस प्रोटोकॉलद्वारे उर्जा साठ्याची किंमत खूप कमी होईल.

Leave a Comment